Toll Free - Helpline No.: 1800 22 1250

OUR MOTTO : "Safe & Accident Free Bus Service"

Highlight:
  • Goods Transport Services of MSRTC" For more information pl. contact :- 022-23024068
  • For Technical Assistance ,Please Call 022-23053992
  • For any assistance/queries in respect of online reservation system contact our Call-Centre No. 1800221250

Computerized / Manual Advanced Booking and Cancellation


१. प्रवाशांकडून प्रवास भाडयापेक्षा जादा पैसे घेतल्यास परतावा करणेबाबत-

प्रवासी सुट्ट्या पैशाअभावी प्रवास भाडयापेक्षा जास्त पैसे वाहकास देत असतात, अशा प्रसंगी सुट्टे पैसे तात्काळ प्रवाशास परत करणे वाहकास शक्य नसल्यास वाहक प्रवास भाडयापेक्षा जादा जमा झालेली / परतावा करावयाची रक्कम प्रवाशांच्या तिकीटांच्या मागे नोंद करुन स्वाक्षरी करतात़ संबंधित प्रवाशाने तिकीटाच्या मागे नोंद केलेली रक्कम अंचूक असल्याबाबत व्यक्तिशः खात्री करणे आवयक आहे़. नोंदविलेल्या रक्कमेचा परतावा मिळण्यासाठी प्रवाशाने आगार प्रमुखास प्रवास करीत अंसलेल्या गाडीचा क्रमांक, दिनांक व वेळ नोंदवून व त्यासमवेत प्रवासाची तिकीटे जोडून परतावा मिळण्याबाबतचा अंर्ज करणे आवयक आहे़.

सदर अर्जाचा विहित नमुना नसून तो साध्या प्रकारे केला जाऊ शकतो़ अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित आगार प्रमुख अर्जासमवेत जोडलेली तिकीटे व इतर तपशील यांची पडताळणी करतात व सदरची तिकीटे नमूद केलेल्या मार्गावर विक्रि झालेली आहेत आणि अधिकृत तिकीटे असल्याची खात्री करुन परतावा देण्याची कार्यवाही करतात़ प्रवाशांनी शक्यतो असा परतावा एक महिन्याच्या कालावधीत मागणी करणे आवयक आहे़ आगाऊ आरक्षण तिकीट परतावा - महामंडळाने प्रवासाची रक्कम आगाऊ भरुन तिकीटे देण्याची सोय उपलब्ध करुन दिलेली आहे़ काही अपरिहार्य कारणांमुळे महामंडळाची नियत बस रद्द झाली तर संपूर्ण रक्कम (आरक्षण आकारासह) संबंधित प्रवाशास परत करण्यात येते़

२. मार्गात बस बंद पडल्यास द्यावयाचा परतावा -

काही प्रसंगी महामंडळाच्या बसेस मार्गात यांत्रिकी कारणांमुळे बिघाड होऊन बंद पडल्यास प्रवाशांना पुढे प्रवास करणे सोयीचे होत नाही़ अशावेळी प्रवाशांना न झालेल्या प्रवासाच्या प्रवासभाडयाची रक्कम परताव्यापोटी देण्यात येते़ तथापि,याकरिता पुढील नियम विचारात घेणे आवयक आहे. प्रवाशांची पर्यायी बसने व्यवस्था न झाल्यास,बदली गाडी उपलब्ध न झाल्यास व नैसर्गिक आपत्तीमुळे बस पुढे न जाऊ शकल्यासच परतावा देण्यात येतो,याप्रसंगी वाहक प्रवाशांची तिकीटे परत घेवून प्रत्येक प्रवाशास तात्काळ परतावा देतो़

३. उच्चत्तम सेवेची बस रद्द झाल्यास द्यावयाचा परतावा

काही प्रसंगी वातानुकूलित,निमआराम,आराम बसेस मार्गस्थ बंद पडल्यास अथवा अशा बसेस नियोजित मार्गावर न चालविल्यास, अशा बस सेवांचे आगाउ आरक्षण केलेले तिकीटधारक प्रवासी अथवा या बसेसमधून प्रवास करणारे प्रवासी यांना साध्या बसेसद्वारे / निम्नस्तर सेवेद्वारे प्रवास करावा लागतो, अशा प्रसंगी प्रवासभाडे फरकाची रक्कम प्रवाशांना परताव्या पोटी त्वरित वाहकाकडून अदा करण्यात येते़

४. सामानाचा जादा आकार वसूल केल्यास द्यावयाचा परतावा

काही प्रसंगी प्रवाशांच्या सामानाचे वजन न करता वाहक अंदाजाने सामानाचा आकार प्रवाशांकडून वसूल करतो, परंतु, बसस्थानकावर सदर सामानाचे वाहकासमोर पुन्हा वजन केले आणि घेतलेला आकार हा वाहकाने जास्त घेतला आहे,असे सिध्द झाल्यास वसूल केलेल्या जादा रकमेचा परतावा प्रवाशांना मिळू शकतो,अशावेळी संबंधित प्रवाशाने स्थानक प्रमुखाकडे अर्ज करुन परताव्याची रक्कम प्राप्त करुन घ्यावयाची आहे, त्याचप्रमाणे पुनर्वजन करताना स्थानक प्रमुख यांची उपस्थिती आवयक आहे़

५. हरवलेल्या तिकीटाचा परतावा --

काही प्रसंगी प्रवाशाने घेतलेले आगाऊ आरक्षण तिकीट गहाळ होते आणि प्रवासाच्या वेळी सदर तिकीट दाखविता येत नाही, अशाप्रसंगी ज्या आसन क्रमांकाचे तिकीट असेल त्या आसन क्रमांकावर नविन तिकीट काढून प्रवास करता येईल़ तथापि, गहाळ तिकीट नंतर मिळाल्यास प्रवास तारखेपासून एक महिन्याच्या आत संबंधित प्रवाशाने हरवलेले तिकीट व नविन घेतलेले तिकीट जोडून विभाग नियंत्रक यांचेकडे अर्ज करावा़ अशा अर्जाचा उचित खातरजामा करुन तिकीट रकमेच्या २५% रक्कम कपात परतावा प्रवाशास मिळू शकतो़ मात्र, हरवलेल्या तिकीटाचे मूल्य रु़ १०/- जास्त असणे आवयक आहे़

प्रवाशाचे आगाऊ आरक्षण तिकीट चोरीला गेलेले असल्यास व चोरीबाबतची तक्रार पोलीस स्टोनमध्ये नोंदविलेली असल्यास आणि तिकीटाचा परतावा कोणीही मागितलेला नसेल अशा प्रकरणीसुध्दा वर नमूद केल्याप्रमाणे प्रवाशास परतावा मिळतो़

 

इ -तिकीटाबाबतची आरक्षण कार्यपद्धति व आरक्षण रद्द करावयाची नियमावली पुढीलप्रमाणे आहे़

६. इ-तिकीटसंबंधी अंटी व शर्ती

१. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, प्रवाशांना इंटरनेटद्वारे आगाऊ आरक्षण करण्याची सुविधा उपलब्ध करुन देईल़ यासाठी आगाऊ आरक्षणाबाबत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने विहीत केलेले व इतर खास नियम लागू राहतील़ यामधील काही खास अटी व शर्ती याबाबतच तपशील खाली देण्यात येत आहे़
२. रा़ प महामंडळाच्या www.msrtc.gov.in या संकेतस्थळावरुन (वेबसाईट) आगाऊ आरक्षण करण्यासाठी खालील अटी व शर्ती लागू राहतील़. कृपया सदर अंटी व शर्तींचे काळजीपूर्वक अंवलोकन करुन मान्य असल्यास, इंटरनेटद्वारे संकेतस्थळावरुन नोंद करण्यात येऊन आगाऊ आरक्षण करण्यात यावे़ रा़ प संकेतस्थळावर एका व्यक्तिला एकापेक्षा जास्तवेळा नाव नोंदणी करता येणार नाही़ संकेतस्थळावर नाव नोंदणी केली म्हणजे याबाबत विहीत केलेल्या खालील सर्व अंटी व शर्ती मान्य आहेत अंसे समजण्यात येईल़. सदरच्या अंटी व शर्ती मान्य नसल्यास, रा़ प महामंडळाचे संकेतस्थळावरुन इंटरनेटद्वारे आगाऊ आरक्षण करता येणार नाही़. लॉग-इन पेजवरील अटी व शर्तींच्या खाली अंसलेले ''I Agree” (मान्य आहे) हे बटन दाबले म्हणजे आपण रा़ प महामंडळासमवेत संकेतस्थळावरुन आरक्षण करण्याबाबतचा करार केला असे समजण्यात येईल़
३. एकाच व्यक्तिने अनेकवेळा नाव नोंदणी करणे म्हणजे विहीत केलेल्या अटी व शर्तींचा भंग केला असे समजण्यात येऊन सदरची नाव नोंदणी तात्काळ रद्दबातल केली जाईल व सदरच्या नाव नोंदणीनुसार आरक्षित केलेली सर्व तिकीटे कोणतीही पूर्व सूचना न देता रद्द केली जातील़
४. सदरच्या कराराचे पालन सध्या आस्तित्वात असलेले सर्व कायदे व भारत सरकारने विहीत केलेली कायदोशीर कार्यपध्द्ती याचे अधिन राहून व महामंडळाच्या अधिकाराला कोणतीही बाधा न येता प्रवाशांना रा़ प संकेतस्थळावरुन आगाऊ आरक्षण करण्याच्या दृष्टीने आवयक अंसलेली माहिती जमा करुन अथवा पुरवून करण्यात येईल.  आपण पुरविलेल्या माहितीचा वापर संकेतस्थळाचा वापर करण्यासाठी, संकेतस्थळावरुन केलेल्या व्यवहाराचे अंनुषंगाने निर्माण झालेले वाद अथवा तक्रारी सोडविण्याचे दृष्टीने, नियंत्रीत करण्याचे दृष्टीने पोलीस, नियंत्रण करणारे अधिकारी अथवा इतर त्रयस्थ पक्षामार्फत करण्याबाबत आपली संमती राहील़
५. या करारातील कोणताही भाग लागू असलेल्या कायदयान्वये, अयोग्य अथवा अमलबजावणी करता न येण्यासारखा परंतु, याबाबत याठिकाणी नमूद करण्यात आलेली जबाबदारी अंथवा दिलेली ग्वाही याचोशी संबंधित नसेल, इथपर्यंतचा भाग वगळता असा अयोग्य अथवा अंमलबजावणी करता न येण्यासारखा भाग याची जागा योग्य बदलाने अथवा अंमलबजावणी करता येण्यासारख्या तरतूदी घेतील व उर्वरित करार हा लागू राहील़
६. सदरचा करार हा रा़ प संकेतस्थळाद्वारे आगाऊ तिकीट आरक्षण करण्यासाठी ग्राहक व रा़ प महामंडळ यांच्यामध्ये झालेला परिपूर्ण करार समजण्यात येऊन यासंकेतस्थळाचे बाबत अंथवा यासंबंधात यापूर्वी ग्राहक व रा़ प महामंडळ यांच्यामध्ये करण्यात आलेले मौखिक, इलेक्ट्रॉनिक अथवा लिखीत स्वरुपात झालेला कोणताही करार संपुष्टात येईल़ इतर करारांप्रमाणेच या कराराची छापील प्रत किवा इलेक्ट्रॉनिक पध्दतीने पाठविण्यात आलेली नोटीस कायदोशीर अथवा प्राशसकीय प्रक्रियेमध्ये ग्राहय धरण्यात येईल़ इ-तिकीट आरक्षित करण्याची कार्यपध्द्ती रा़ प संकेतस्थळाद्वारे इंटरनेट आगाऊ आरक्षण सुविधेमुळे प्रवाशांना आगाऊ आरक्षण करणे अंथवा आगाऊ आरक्षण रद्द करणेबाबतची सुविधा रा़ प चे आरक्षण वेंत्र्द्र अथवा आरक्षणाची सोय नसलेल्या ठिकाणाहूनही प्राप्त होणार आहे़

७. इंटरनेटद्वारे आगाऊ आरक्षण करण्याची कार्यपद्दती खालीलप्रमाणे राहील़

१. रा़ प महामंडळाचे संकेतस्थळावर इ-तिकीटसाठी नाव नोंदणी केलेल्या नोंदणीधारकास इंटरनेटद्वारे इ-तिकीट आरक्षित करता येईल़ संकेतस्थळावर देण्यात आलेल्या ई-फॉर्ममध्ये वैयक्तिक तपशील भरल्यानंतर आपणास युजरनेम आणि पासवर्ड मिळेल
२. रा़ प महामंडळाने आगाऊ आरक्षणासाठी विहीत केलेल्या कालवधीत आगाऊ आरक्षण करता येईल़ सदर तिकीटाचे पैसे क्रेडिट कार्ड / डेबीट कार्ड / कॅश कार्ड / इंटरनेट बँकीगद्वारे भरावे लागतील़
३. ज्या प्रवाशांना तिकीट आरक्षित करावयाचे आहे त्यांना रा़ प च्या संकेतस्थळावर जाऊन इ-तिकीटासाठी पुरविण्यात आलेल्या लिंकमध्ये जावे लागेल़ आगाऊ आरक्षणासाठी प्राप्त होणारी आसने ही प्रवाशांनी निवडलेल्या सेवाप्रकारानुसार प्राप्त होतील़
४. प्रवास करू इच्छिणार्या प्रवासी किवा आरक्षणामध्ये नावे असलेल्या गटातील कोणत्याही एका प्रवाशाने प्रवासाच्या सुरुवातीच्या ठिकाणी मुळ ओळखपत्र सादर करणे आवयक राहील़ उदा़ पासपोर्ट, वाहन चालविण्याचा परवाना, मतदानाचे ओळखपत्र, पॅन कार्ड इ़ ओळखपत्राची छायांकित प्रत ग्राह्य धरली जाणार नाही़
५. कामगिरीवरील वाहक अथवा रा़ प महामंडळाने प्राधिकृत केलेली व्यक्ति यांचेकडून प्रवाशाचे इ-तिकीट, ओळखपत्राची तपासणी आरक्षणतक्त्यानुसार करण्यात येईल़ प्रवासी वरीलप्रमाणे विहीत केल्याप्रमाणे प्रवासादरम्यान मुळ आोळखपत्र सादर करू न शकल्यास त्यांनी सादर केलेले तिकीट ग्राश तिकीट समजण्यात येणार नाही व त्यांना 'विनातिकीट प्रवासी' समजण्यात येईल़ ओळखपत्राची छायांकित प्रत ग्राह्य धरली जाणार नाही़ रा़ प प्रवाशाकडे इ-तिकिटाची प्रिंट (हार्ड कॉपी) प्रवास करताना नसल्यास अपवादात्मक परिस्थितीत प्रवाशांकडील मोबाईल,लॅपटॉप इत्यादीचे स्क्रीनवर असलेले तिकिट (सॉफ्ट कॉपी) आरक्षण तक्ता (WBR) यावरील नोंद व प्रवाशाचे फोटो असलेले ओळखपत्र तपासुन प्रवास करण्याची अनुमती देण्यात येईल मात्र नुसत्या मोबाईल वरील लघुसंदेशावरुन (मेसेज) प्रवास करण्यास अनुमती दिली जाणार नाही़
६. इंटरनेटद्वारे आगाऊ आरक्षण करणार्या प्रवाशांना सूचित करण्यात येते की, इंटरनेटद्वारे आगाऊ आरक्षण केल्यानंतर सदर तिकीट त्वरित छापून घेण्यात यावे़ जेणे करुण संकेतस्थळावरुन आरक्षण करणार्या प्रवाशांची गर्दी होऊन तिकीट छापण्याची गैरसोय होणार नाही़ सदरचे तिकीट प्रवास करताना दाखवावे लागेल अन्यथा प्रवास करता येणार नाही़
७. इ- तिकीट सुविधा ही ज्या प्रवाशांना प्रवासभाडयामध्ये सवलत लागू केलेली आहे अशा प्रवाशांना लागू होणार नाही़ तसेच मासिक / त्रैमासिक विद्यार्थी / प्रवासी पासधारक, रा़ प महामंडळाचे पासधारक कर्मचारी यांनाही सदर सुविधेचा फायदा घेता येणार नाही़
८. आरक्षित केलेले इ-तिकीट विहीत केलेल्या कालावधीत रद्द करता येईल़ त्यासाठी इ-तिकीटधारकास आरक्षण तिकीट रद्द करण्यासाठी रा़ प महामंडळाचे संकेतस्थळावर लाग-इन करावे लागेल व तिकीटावरील माहीती दिलेल्या नमुण्यात भरावी लागेल़
९. मे़. अॅटम टेवक्नॉलॉजिस लिमिटेड, मुंबई यांच्या सहयोगाने इंटरनेट सुविधा असलेल्या भ्रमणध्वनीद्वारे (मोबाईल) इत्यादिंवर तिकीट आरक्षणाची सुविधादेखील प्रवाशांना उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे़ त्यामुळे प्रवाशांना मोबाईलवरुनसुध्दा आगाऊ आरक्षण तिकीट उपलब्ध होऊ शकेल
१०. ई-तिकीट काढणा-या प्रवाशांना आरक्षित केलेल्या तिकीटावर इत्यंभूत माहिती लघुसंदेशाद्वारे (SMS) पाठविण्यात येते़. सदरची माहिती गाडी सुटण्याच्या ४ तास अगोदर रिमार्ईंडर एसएमएसद्वारे पाठविण्यात येते़ ई-तिकीट धारकाने आपले तिकीट रद्द केल्यास, सदर प्रवाशास त्याचे तिकीट रद्द झाले असल्याबाबतचासुध्दा एसएमएस पाठविण्यात येतो़

८. इ-तिकीट प्रवासभाडे, आरक्षण व इतर आकारः-

१. प्रवासाचे भाडे प्रचलीत नियमानुसार व दराप्रमाणे आकारण्यात येईल़
२. आगाऊ आरक्षण आकार हा साध्या सेवेसाठी प्रती आसन, प्रती प्रवासी रु़ ५/-, निमआराम सेवेसाठी रु़ ५/- आणि वातानुकुलीत सेवेसाठी रु़ १०/- राहील
३. वरील आकाराव्यतिरीक्त प्रवास भाडे + आरक्षण आकारावर परत करता येणार नाही असा सुविधा आकार १. ००% + सेवा कर १२. ३६% आरक्षण करताना व आरक्षण रद्द करताना आकारण्यात येईल़
४. जर प्रवासभाडे सुधारीत झाल्यास, सेवाप्रकारामध्ये बदल झाल्यास, मार्गात बदल झाल्यास या अथवा अन्य कारणाने प्रवासभाडयात वाढ होत असल्यास प्रवाशास प्रवासाच्या सुरुवातीचे ठिकाणीच असे वाढीव प्रवास भाडे महामंडळास अदा करावे लागेल़

९. इ-तिकीट रद्द करण्याबाबतचे नियम व परताव्याबाबतची कार्यपद्दतीः-

१. तिकीट रद्द करण्याची वेळ व व ज्या फेरीचे आरक्षण केलेले आहे अशी फेरी सूटण्याचे ठिकाण व ती फेरी सूटण्याची वेळ यावर परताव्याची टक्केवारी अवलंबून राहील़ फेरी सूटण्याचे ठिकाण व ती फेरी सूटण्याची वेळ व प्रवासाचे ठिकाण इ-तिकीटावर नमुद करण्यात येईल़
२. रद्द आकार हा रद्द करावयाच्या इ- तिकीटावरील प्रवास भाडयानुसार ठरविण्यात येईल़
३. आरक्षण आकार व सुविधा आकार कोणत्याही परीस्थितीत परत केला जाणार नाही़
४. इ-तिकीट रद्द कारावयाचे झाल्यास ते पुर्णपणे रद्द करावे लागेल़ आरक्षित इ-तिकीटाचा केवळ काही भाग रद्द करता येणार नाही़ ५. इ-तिकीट फेरी सुटण्याच्या नियोजित वेळेच्या ४ तास अगोदरपर्यंत किवा अपवादात्मक परिस्थितीत ४ तासांपूर्वी आरक्षण तक्ता (WBR) काढल्यास, त्या कालावधीपर्यंत तिकीट रद्द करण्याची सुविधा उपलब्ध राहील़ सदरचा कालावधी संपल्यानंतर असे आरक्षित केलेले तिकीट रद्द केल्यास / करावयाचे असल्यास त्यावर कोणताही परतावा दिला जाणार नाही़ त्याचप्रमाणे इ-तिकीटधारकाने प्रवास केला नाही अंगर प्रवासाच्या वेळी गैरहजर राहीला तर अशा वेळी देखिल कोणताही परतावा दिला जाणार नाही़
६. जर प्रवाशाने आरक्षित केलेल्या इ-तिकीटावरील सेवा प्रकारात प्रत्यक्ष प्रवासाचे वेळी बदल झाल्यास म्हणजेच उच्च सेवेचे तिकीट असेल व निम्नस्तरीय सेवेने प्रवास करावा लागल्यास, गाडीमध्ये मार्गस्थ बिघाड झाल्याने प्रवास रद्द करावा लागल्यास अथवा निम्नस्तरीय सेवेने प्रवास करावा लागल्यास, सेवा रद्द झाल्यास, भाडयामध्ये कपात झाल्यास अथवा फेरीस नियोजित वेळेच्या १ तासापेक्षा अधिक विलंब झाल्याने प्रवाशाने प्रवास रद्द केल्यास वा चालक/ वाहकांनी मधल्या थांब्यावर बस न थांबविल्यामुळे अथवा बस अन्य मार्गाने नेल्यामुळे आरक्षणधारी प्रवाशास त्या गाडीने प्रवास करता आला नाही या कारणांस्तव प्रवाशास जो काही परतावा देय होईल त्याबाबतची रक्कम पेमेंट गेटवे मार्फत संबधितांचे बँक खात्यावर जमा होईल़ प्रवाशांना देय असलेला परतावा रोख रकमेच्या स्वरूपात अदा केला जाणार नाही़ यासाठी प्रवाशांना त्यांचेकडील इ-तिकीटाची छापिल प्रत रा़ प महामंडळाच्या संबधित प्राधिकार्याकडे व्यक्तिशः सादर करावी लागेल

१०. सर्वसाधारण नियमः

१. आरक्षण करण्याचे व आरक्षण रद्द करण्याचा कालावधी आठवडयातील सर्व दिवाशी ००. ३० ते २३. ३० असा राहील त्यामध्ये आवयकतेनुसार बदल करण्यात येईल़
२. ज्या फेरीचे आगाऊ आरक्षण करावयाचे आहे त्या फेरीचे आरक्षण सदर फेरी सुटणार्या दिवाशी व सुटण्याच्या नियोजित वेळेपुर्वी १ तास अगोदर पर्यंत किंवा त्या फेरीचा आरक्षण तक्ता (विंडो बुकींग रिटर्न) छापण्याची वेळ यापैकी जे अगोदर घडेल त्या वेळेपर्यंतच मिळू शकेल
३. नियोजित फेरीस सुटण्यास / पोहचण्यास नियोजित वेळेपेक्षा विलंब झाला, मार्गात बदल झाला, सेवापरकारात बदल झाला या व इतर अन्य कारणाने प्रवाशास कोणतेही नुकसान पोहोचल्यास अगर प्रवाशाची कोणतीही गैरसोय झाल्यास त्याबाबत रा़ प महामंडळ जबाबदार राहणार नाही़
४. एकदा आरक्षण करण्यात आल्यानंतर त्यामध्ये प्रवासाची तारीख /वेळ , नांव , लिंग , वय,बसण्याचे ठिकाण इ. यामध्ये बदल करता येणार नाही.

११. तिकीट रद्द करण्याबाबतचे नियम व परताव्याबाबतची कार्यपद्दतीः


दिनांक १०.०६.२०१७ पासून सामान्य स्थायी आदेश क्रमांक १२०० दिनांक १०.०३.२००८ कलम क्रमांक ३.१ मध्ये पुढील प्रमाणे बदल करण्यात येत आहे.
1.        बस फेरी सुटण्याच्या नियोजित वेळेच्या २४ तास अगोदर पर्यंत तिकीट रद्द केल्यास १० टक्के प्रवास भाडे वसूल करून + आरक्षण आकार कपात करण्यात येईल.

2.        बस फेरी सुटण्याच्या नियोजित वेळेच्या १२ तास अगोदर पर्यंत तिकीट रद्द केल्यास २५ टक्के प्रवास भाडे वसूल करून + आरक्षण आकार कपात करण्यात येईल.

3.        बस फेरी सुटण्याच्या नियोजित वेळेच्या ०४ तास अगोदर पर्यंत तिकीट रद्द केल्यास ५० टक्के प्रवास भाडे वसूल करून + आरक्षण आकार कपात करण्यात येईल.

4.        बस फेरी सुटण्याच्या नियोजित वेळेच्या ०४ तास अगोदर पर्यंत तिकीट रद्द करता येईल सदर कालावधी नंतर आरक्षित तिकीट रद्द करता येणार नाही.

5.        तिकीट रद्द करण्याकरिता कोणताही आकार ( रद्दीकरण आकार )घेण्यात येणार नाही.( पूर्वी जो कलम ३.२ मधील (i) (ii) तरतुदी प्रमाणे ०.५० पैसे व रु.१.०० आकारण्यात येत होता)

6.        पुसट,खराब झालेल्या,फाटलेल्या किंवा जीर्ण झालेल्या आगाऊ आरक्षण तिकिटावर परतावा मिळणार नाही.
 
टीप : नियोजित सुटण्याची वेळ म्हणजे मूळ ठिकाणा पासून ( बस स्थानक ) सुटण्याची वेळ