Toll Free - Helpline No.: 1800 22 1250

OUR MOTTO : "Safe & Accident Free Bus Service"

Highlight:
  • Goods Transport Services of MSRTC" For more information pl. contact :- 022-23024068
  • किल्ले रायगड दर्शन.... आता एसटीने....ते ही, माफक दरात..!
  • एसटीची नाथजल शुद्धपेयजल योजना कार्यान्वित. मंत्री,ॲड. अनिल परब यांच्या हस्ते लोकार्पण..!
  • For Technical Assistance ,Please Call 022-23053992
  • For any assistance/queries in respect of online reservation system contact our Call-Centre No. 1800221250

Casual Contract for Bus Service


प्रासंगिक / नैमित्तीक करारावर बसची मागणी

प्रांसगिक करारावर बसची मागणी करावयाची झाल्यास इच्छुक प्रवाशाने संबंधित / नजीकच्या आगार कार्यालयाशी संपर्क साधून प्रासंगिक कराराचा मार्ग, कराराचा कालावधी इत्यादि तपशिल सादर केल्यास, इच्छुक प्रवाशांस प्रासंगिक करारापोटी महामंडळाकडे जमा करावयाची आगाऊ रकमेची माहिती प्राप्त होऊ शकते इच्छुक व्यक्तिने सदरची माहिती प्राप्त करून घेतल्यानंतर त्यास प्रासंगिक करारावर बस नोंदणी करावयाची असल्यास विहीत नमुन्यातील मागणी अर्ज संपुर्ण तपशिलासह आगार व्यवस्थापक यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे़ तदनंतर, सदर अर्जास आगार व्यवस्थापक यांची संमती प्राप्त झाल्यानंतर मागणी कर्त्याने प्रासंगिक कराराच्या रकमेचा भरणा रोकड शाखेत करून नैमित्तीक करारावर बस नोंदवून त्यापोटी आगाऊ रक्कम जमा केल्यानंतर त्यास पावती देण्यात येते़

प्रासंगिक करारासाठी आगाऊ रक्कम निश्चित करतांना कि़ मी़ खोळंबा आकार, अतिकालीक भत्ता इ नुसार येणा-या रकमेवर १०% अधिक रक्कम आकारणी करण्यात येऊन येणारी रक्कम आगाऊ भरणा रक्कम म्हणून निश्चित करण्यात येते़ नैमित्तीक करारासाठी प्रवासी गर्दीच्या हंगामानुसार दर ठरविण्यात आलेले आहेत़ हंगामाचा कालावधी पुढील प्रमाणे-

१. गर्दीचा हंगाम - १ मार्च ते ३० जून
२. कमी गर्दीचा हंगाम - १ जुलै ते २८/२९ फेब्रुवारी

आंतरराज्य नैमित्तीक करार
आंतरराज्य मार्गावरील प्रासंगिक कराराकरीता संबंधित राज्यातील मोटार वाहन कर, प्रवासी कर, व इतर अनुंषगिक करांचा भरणा काही राज्यांकरीता आगाऊ करणे आवश्यक अंसते़ त्याचप्रमाणे प्रासंगिक कराराकरीता आंतरराज्य मार्गावर दयावयाच्या बसेसचा तपशिल आगाऊरित्या परिवहन विभागास कळविणे आवश्यक अंसल्याने आंतरराज्य मार्गावर प्रासंगिक करार करावयाचा असल्यास, नागरिकांनी आगाऊ नोंदणी करणे आवश्यक आहे़ मोटार वाहन व इतर कराबाबतची माहिती आगार व्यवस्थापक यांचेकडे उपलब्ध आहे़ त्यांचेशी संपर्क साधावा़

साध्या बसमध्ये आसन क्षमतेच्या २५% प्रवासी मोफत नेण्याची सवलत

प्रासंगिक करारावर नोंदविलेल्या साध्या बसेसच्या आसनक्षमतेपेक्षा २५% अधिक प्रवासी कोणताही अधिक आकार अंदा न करता मोफत नेण्याची मुभा देण्यात येते़ आंतरराज्य नैमित्तिक करारास ही सवलत उपलब्ध नाही़ प्रासंगिक करारकर्त्याने नोंदविलेल्या तारखेस व वेळेस नोंदविलेल्या संख्येने बसेस महामंडळाकडून उपलब्ध करून देण्यात येतात़

१. सरासरी ३०० कि़ मी़ पेक्षा जास्त आकारणीय कि़ मी़ झाले पाहिजेत़
२. शैक्षणिक सहलीसाठी विद्यार्थी / विद्यार्थीनींसाठी ५०% कि़ मी़ दरांत सवलत देण्यात येते़