Mechanism for Good Administration and Management
(१) त्रैमासिक पास योजना :
दैनंदिन एकाच मार्गावर नोकरी,व्यवसाय व अन्य कारणांमुळे प्रवास करणारा प्रवासी महामंडळाकडे आकर्षित व्हावा या हेतूने महामंडळाने त्रैमासिक पास योजना सुरु केलेली आहे.त्रैमासिक पास योजनेची ठळक वैशिष्टये पुढील प्रमाणे :
१. सदर योजना एकाच मार्गावर सातत्याने प्रवास करणार्या प्रवांशाकरीता लाभदायक
२. या योजनेअंतर्गत पास धारकास जवळजवळ ५०% प्रवास भाडे सवलत देण्यात येते.
३. योजनेचा लाभ घेऊ इच्छिणार्या नागरीकांना / प्रवाशांना विहीत नमुन्यातील अर्ज तपशिलासह नजिकच्या बस स्थानकावर सादर करणे आवश्यक आहे.सदर अर्जावर पासपोर्ट आकाराचा फोटो लावणे आवश्यक आहे.
४. पास घेऊ इच्छिणार्या नागरीकांना २ पासपोर्ट आकाराचे फोटो व रुपये ५/- देऊन ओळखपत्र प्राप्त करणे आवश्यक आहे.
५.ओळखपत्र प्राप्त झाल्यावर अर्जधारकाने पासाची मागणी केलेल्या मार्गाकरीताच ५० दिवसांचे परतीचे भाडे महामंडळाकडे जमा केल्यास त्यास ३ महिन्याचा कालावधी असलेला पास देण्यात येईल.
६. सदर पास शहरी,साध्या व निमआराम सेवांकरीता अनुज्ञेय राहिल. निमआराम सेवेच्या पासाकरीता निमआराम भाडे दर पत्रकानुसार पासेसचे मुल्य निश्चित करण्यात येते.
७. सदर योजनेची अधिक माहिती व तपशिल महामंडळाच्या सर्व बस स्थानकांवर उपलब्ध आहे.
८. साधी बस सेवा धारकांस निमआराम बस सेवेद्वारे प्रवास अनुज्ञेय आहे. या करीता पास धारकाने प्रवास मार्गाच्या साधी व निमआराम बस भाडयाच्या फरकाची रक्कम वाहकाकडे अदा करुन तेवढया रक्कमेचे प्रवास तिकीट घेणे आवश्यक आहे.
(२) मासिक पास योजना :
सदर योजने अंतर्गत २० दिवसांचे परतीचे प्रवासभाडे आकारणी करुन एक महिना ३० दिवसांचे कालावधीचा परतीचा पास देण्यात येतो. या योजनेच्या अटी,शर्ती या त्रैमासिक पास योजनेप्रमाणेच असुन या योजनेअंतर्गत प्रवाशांना सुमारे ३३.३३% प्रवास भाडे सवलतीचा लाभ होतो. सदर योजने अंतर्गत पास प्राप्त करण्याची पध्दतीसुध्दा त्रैमासिक पास योजने प्रमाणेच आहे. तथापि,या योजनेअंतर्गत पास धारकांस ज्या सेवेचा पास असेल त्या सेवेद्वारे प्रवास अनुज्ञेय आहे.
(३)आवडेल तेथे कोठेही प्रवास योजना:-
ठराविक कालावधीसाठी सलग प्रवास करणारा प्रवासी महामंडळाच्या सेवेकडे आकृष्ट व्हावा आणि या प्रवाशाना प्रवास भाडे सवलत मिळावी या हेतूने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ''आवडेल तेथे कोठेही प्रवास'' योजना अमलात आणलेली आहे, या योजने अंतर्गत ४ व ७ दिवस कालावधीचा पास देण्यात येतो.या योजने अंतर्गत पासेसचे मुल्य प्रवासी हंगामानुसार निर्धारीत करण्यात आलेले असून हंगामाचा कालावधी पुढीलप्रमाणेः- गर्दीचा हंगाम-१५ ऑक्टोबर ते १४ जूऩ कमी गर्दीचा हंगाम-१५ जून ते १४ ऑक्टोबर
या योजनेची वैशिष्ठे :-
या योजनेअंतर्गत ७ व ४ दिवसाचे पास दिले जातात. साध्या सेवा (साधी, जलद, रात्रसेवा, शहरी, जनतासेवा, मिनी, मिडीबस),निमआराम,शिवशाही,विनावातानुकुलीत शयनयान व शयनयान आसनी, व आंतरराज्य सेवेच्या (साध्या व निमआराम) बसेसना ही योजना लागू करण्यात आली आहे.आंतरराज्य वाहतूकीवरील बसेससाठी दिला जाणारा पास साधी सेवा व निमआराम सेवेच्या बसेसमध्ये महाराष्ट्र राज्यातसुध्दा वैध राहील़ उच्च दर्जाच्या सेवेचा पास निम्न दर्जाच्या सेवेस वैध राहील.जसे,निमआराम बसचा पास साधी,जलद,रात्रसेवा,शहरी,जनतासेवा,मिनी व मिडी बसला वैध राहील या योजनेचे पास प्रवास सुरू होण्याच्या १० दिवस अगोदर देण्यात येईल.या योजनेअंतर्गत देण्यात आलेले पास नियमीत गाडीसोबतच कोणत्याही जादा बसमध्ये किवा पंढरपूर/आळंदी, गौरी गणपती, होळी, इत्यादि प्रसंगी सोडण्यात येणा-या जादा बसमध्ये किवा यात्रा बसमध्ये वैध राहतील.आवडेल तेथे कोठेही प्रवास पास धारकास जादा बसमध्ये किंवा पंढरपूर / आळंदी, गौरी-गणपती, होळी इत्यादि प्रसंगी सोडण्यात येणा-या बसमध्ये किंवा यात्रा बसमधून प्रवास करण्यास परवानगी दिल्याने ते पास धारक आहेत म्हणून त्यांना प्रवास नाकारू नये व जेणेकरून प्रवाशांना त्यामुळे कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेऊन तशा सुचना संबंधित कर्मचा-यांना देण्यात आलेल्या आहेत. सदर पासावर प्रवास करणा-या प्रवाशाना ते पासधारक आहेत म्हणून प्रवास नाकारू नये परंतु पास धारकांसाठी जादा अथवा खास बस सोडण्यात येणार नाही.गाडीतील आसनासाठी हमी देता येणार नाही.परंतु या योजनेतील पास धारकाना आसन आरक्षित करावयाचे असल्यास तो आपल्या बसमधील आसनाचे आरक्षण करू शकतो.त्यासाठी त्यास आरक्षणाचा प्रचलित आकार देऊन आरक्षणाचे तिकीट घ्यावे लागेल.या योजनेअंतर्गत प्रौढ पासधारकास ३० किलो पर्यंत व मुलास १५ किलोपर्यंतचे सामान विनाआकार नेता येईल. प्रत्येक पासावर पासधारकाचा फोटो लावणे आवश्यक राहील.पासावर पंचींग पध्दत सुरू करण्यात आली आहे.त्यामुळे वाहकाने प्रवासाच्या तारखेच्या अंकाची टिकली पडून छिद्र पडेल अशा पध्दतीने पंच करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.एक वेळ पंच केलेला पास पुन्हा पंच करण्याची आवश्यकता नाही.पासावरील प्रवासाच्या तारखेस पास पंच केलेला असला तरी पासाच्या मुदतीत प्रवासी प्रत्येक दिवशी कोणत्याही मार्गावर कितीही वेळा त्या पासावर प्रवास करू शकेल. राप/वाह/सामान्य- ८८/८०७२ दिनांक ०२.११.१९९८ - वाहतूक खाते परिपत्रक क्रमांक ३०/१९९८ अन्वये दिलेल्या सुचनांनुसार घरातील नातलगाचा मुत्यू, भुवंत्र्प,आग लागणे,अतिवृष्टी,महापूर नैसर्गिक आपत्ती इत्यादी कारणांमुळे पासधारकास पास रद्द करावयाचा असल्यास व त्याने तसे प्रवासाच्या तारखेपुर्वी पुराव्यासह कळविले असल्यास प्रत्येक पासामागे रू १०/- सेवा शुल्क वसुल करून उर्वरीत रकमेचा त्यास परतावा देण्यात येतो. परंतु अशा बाबतीत सदर पासावर पुढील तारखेस प्रवास करण्याची प्रवाशाची इच्छा असल्यास त्याचा जुना पास रद्द करून त्याला नवीन पास देण्यात यावा.अशा प्रकरणी सेवा शुल्क आकारू नये.यासाठीचे अधिकार विभागीय वाहतूक अधिकारी/आगार व्यवस्थापक यांना देण्यात आलेले आहेत.वाहतूक खाते परिपत्रक क्रमांक ३९/२००६-राप/वाह/चालन/सा. ८८/६७१० दिनांक ०९ ऑक्टोबर, २००६ अन्वये जर एखादा प्रवासी अचानक आजारी झाला व त्यास प्रवास करणे शक्य नसेल आणि त्याने तसा वैद्यकिय दाखला सादर केल्यास त्यास हा पास रद्द करताना पुर्वी घेत असलेले सेवा शुल्क रू. १०/- आकारून पास रद्द करावा, जर त्या प्रवाशाची नंतर प्रवास करण्याची इच्छा असेल व त्याने तारीख बदलून किवा नवीन पास मागितल्यास त्यास जुना पास रद्द करून नवीन पास देण्यात येईल.जुना पास रद्द करून नवीन पास देताना सेवा शुल्क आकारू नये.सदरचे अधिकार हे पुर्वी प्रमाणेच विभागीय वाहतूक अधिकारी / आगार व्यवस्थापक यांना देण्यात आलेले आहेत.पास हरविल्यास त्याचे ऐवजी दुसरा पास देण्यात येणार नाही.त्यामुळे हरविलेल्या पासावर या योजनेखाली प्रवास करता येणार नाही, तसेच नक्कल (डुप्लीवेत्र्ट) प्रत पास मिळणार नाही.सदर हरविलेल्या पासाचा कोणताही परतावा मिळणार नाही.
मासिक,त्रैमासिक पास/आवडेल तेथे प्रवास/प्रासंगिक करार यांची मागणी करण्याची व प्राप्त करण्याची कार्यपध्दती.
अ.क्र. |
विभागाकडून /कार्यालयाकडून पुरविली जाणारी सेवा |
सेवा पुरविण्यासाठी सादर करावयाची कागदपत्रे |
आवयक कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर किती कालावधीत सेवा पुरविली जाईल |
सेवा पुरविणारा अधिकारी/कर्मचारी |
सेवा विहीत कालावधीत पुरविली न गेल्यास ज्यांच्याकडे तक्रार करता येईल तो अधिकारी व त्याचा दुरध्वनी क्रमांक |
१ |
त्रैमासिक पास योजना |
विहीत नमुन्यातील अर्ज,२ पासपोर्ट आकाराचे फोटो,पासाचे मुल्याची रक्कम |
मागणी केल्यावर तात्काळ पास देण्यात येतो. |
संबधित आगार व्यवस्थापक |
विभाग नियंत्रक |
२ |
मासिक पास योजना |
विहीत नमुन्यातील अर्ज,२ पासपोर्ट आकाराचे फोटो,पासाचे मुल्याची रक्कम |
मागणी केल्यावर तात्काळ पास देण्यात येतो. |
संबधित आगार व्यवस्थापक |
विभाग नियंत्रक |
३ |
आवडेल तेथे प्रवास |
विहीत नमुन्यातील अर्ज,२ पासपोर्ट आकाराचे फोटो,पासाचे मुल्याची रक्कम |
मागणी केल्यावर तात्काळ पास देण्यात येतो. |
संबधित आगार व्यवस्थापक |
विभाग नियंत्रक |
|
|
|
|
|
|
४ |
प्रासंगिक करार |
विहीत नमुन्यातील अर्ज व प्रासंगिक कराराची रक्कम |
मागणीनुसार बस उपलब्ध करुन देण्यात येते. |
संबधित आगार व्यवस्थापक |
विभाग नियंत्रक |
|
|
|
|
|
|
५ |
जादा,यात्रा,बाजार
वाहतुकीकरिता बसेसच्या मागणीबाबत |
मौखिक मागणी |
उपलब्धतेनुसार बस पुरविण्यात येते. |
संबधित आगार व्यवस्थापक |
विभाग नियंत्रक |