प्रवाशांना जास्तीत जास्त प्रवास सुखकर करण्याचे एकमेव ध्येय असून त्यासाठी खालील प्रवासी सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.
आगार -२५० |
बसस्थानके -५९७ |
मार्गस्थ निवारे - ४१५० |
उपहारगृहे व चहाची दुकाने - ९३५ |
पुस्तकांची दुकाने -२४० |
इतर वाणिज्य आस्थापना -२२५३ |
'' सुलभ इंटरनॅशनल '' या संस्थेद्वारे रा. प. बसस्थानकावरील स्वच्छता गृहांची देखभाल वेत्र्ली जाते़ अशा प्रकारची सुलभ स्वच्छता गृहांची व्यवस्था महाराष्ट्रात ३०० ठिकाणी करण्याचे महामंडळाचे उष्टिय आहे. महामंडळात १२६ निरनिराळया ठिकाणी सुलभ स्वच्छता गृहांची सोय करण्यात आली आहे.
प्रवाशांना स्वच्छ व थंड पाणी उपलब्ध व्हावे म्हणून राज्यातील एकुण ८८ रा. प. बसस्थानकांवर आतापर्यंत वॉटर कूलर्स बसविण्यात आलेले आहेत व त्यात आणखी वाढ करण्याच्या दृष्टीने कार्यवाही चालू आहे.
दिनांक १/१/१९९६ पासून मुंबई सेंट्रल येथील बसस्थानकावर फलाट प्रवेश तिकिट योजना चालू करण्यात आली आहे. ज्यांना बसस्थानकात जावयाचे आहे. अशा व्यक्तींना एक रुपयाचे फलाट तिकिट घ्यावे लागेल, परंतु ज्यांचेकडे आरक्षण तिकिट आहे, अशा प्रवाशांना व १२ वर्षांपर्यंतच्या मुलांना हे तिकिट घ्यावे लागत नाही़
ज्येष्ठ नागरिकांना प्रवास भाडयात सवलत महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार दिनांक १ जानेवारी, १९९६ पासून रा. प. महामंडळाच्या साध्या/ जलद व रातराणी सेवांच्या प्रवाशी भाडयात ज्येष्ठ नागरिकांना ( ६५ वर्षावरील ) ५० % सवलत देण्यात येत होती, ती शासन निर्णय क्र. एसटीसी/३४०१ प्र.क्र.-११२/परि-१, दिनांक ६/९/२००१ अन्वये दिनांक २०/९/२००१ पासून ३३. ३३ % सवलत देण्यात येत होती़ परंतु दिनांक २७/७/२००४ पासून ज्येष्ठ नागरिकांना, शासन निर्णय एसटीसी ३४०४/सीआर ८४/परी, दिनांक २७. ७. २००४ पासून ५० % सवलत देण्यात येत आहे.
अ. क्र | सोयी-सुविधांचा तपशील | माहिती मिळण्याचे ठिकाण |
---|---|---|
१ | बसेसच्या फेऱ्यांच्या वेळांबाबतची माहिती | बसस्थानक वेळापत्रक फलक, चौकाशी नियंत्रण कक्षाकडे दूरध्वनी, मोफत दूरध्वनी व प्रत्यक्ष चौकाशीव्दारे |
२ | नैमित्तिक करारावर बस मिळणेबाबतची माहिती व मागणी नोंदविणेबाबत | संबंधित आगार व्यवस्थापक |
३ | मासिक / त्रैमासिक पास,आवडेल तेथे प्रवास, विद्यार्थी सवलत पास इ. मिळणेबाबत | संबंधित बसस्थानक प्रमुख |
४ | स्वतंत्र्य सैनिक मोफत पास, अधिस्विकृतीधारक पत्रकार पास | संबंधित विभाग नियंत्रक |
५ | आदिवासी सेवक,दलित मित्र, अण्णाभाऊ साठे पुरस्कारार्थी पास | संबंधित विभाग नियंत्रक |
६ | नवीन बस सेवा सुरु करणे | |
७ | अपघातनुकसान भरपाई रक्कम मिळणेबाबत | ज्या विभागाची बस आहे ते विभाग नियंत्रक |