संपूर्ण राज्य टप्पा व कंत्राटी प्रवासी वाहतूकीचे एकाधिकार काही अपवाद वगळता फक्त म़ रा़ मा़ प महामंडळास आहेत़ पर्यटन परवाना धारण करणा-या खाजगी वाहनांतून फक्त ऐतिहासिक,धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी पर्यटन गटाने कंत्राटी पध्दतीवर प्रवास करू शकतात़ यावाहनांना परवाना नसतानांही टप्पा पध्दतीने प्रवासी वाहतूक करण्यात येते़ अशी वाहतूक बेकायदेशीर असून या वाहनांद्वारे प्रवाशांनी प्रवास करू नये़ काळ्या - पिवळ्या रिक्षा, टॅक्सीमधून मधून ३ ते ६ प्रवाशांच्या गटाने वाहतूक ठरावीक क्षेत्रामध्ये करण्याची परवानगी असते़ मात्र, अशा वाहनांकडून परवान्यातील अटी व शर्तीच उल्लंघन करून आणि निर्धारीत केलेल्या क्षेत्राबाहेर जाऊन प्रवाशांची बेकायदेशीर वाहतूक करण्यात येते़. जीप्स, टेम्पो, टॅक्टर इत्यादि वाहनांना फक्त मालवाहतुकीची परवानगी असते़. अशा वाहनांतून प्रवास करणे बेकायदेशीर आहे़ उपरोक्त अवैधरीत्या प्रवासी वाहतूक करणा-या वाहनांतून प्रवास करणे बेकायदेशीर आहे़ अशा वाहनांतून प्रवास करतांना प्रवासी आढळल्यास त्यांचा खोळंबा होऊन गैरसोय होऊ शकते़ तेव्हा प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी फक्त रा़ प बसनेच प्रवास करावा़
१. मोटार वाहन नियम १०२(२)(८) नुसार बस मध्ये धुम्रपान करण्यास मनाईआहे़
२. मोटार वाहन नियम १०२(२)(८) नुसार स्फोटक व ज्वालाग्राही पदार्थ नेण्यास बंदी आहे़
३. मोटार वाहन नियम १०२(२)(७) नुसार बस मध्ये थुंकण्यास मनाई आहे़
४. मोटार वाहन नियम १०२(१)(५) नुसार बस मध्ये वाद्य वाजविण्यास मनाईआहे़
५. बसच्या दरवाजातून अगर खिडकीमधून शरीराचा कोणताही भाग बाहेर काढु नका़
६. बस चालू असताना बस चालकाशी बोलू नका़
७. ज्या थांब्यावर हमाल नसेल अशा ठिकाणी सामानाची चढ - उतार करण्यांस वाहक मदत करेल़
८. वृत्र्पया प्रवास भाडयाचे योग्य पैसे द्या व तिकीटाचा आग्रह धरा़ त्याच प्रमाणे दिलेले तिकीट उचित मुल्याचे असल्याची खात्री करा़ वाहकाने दिलेले तिकीट प्रवास संपेपर्यंत प्रवाशांनी स्वतःकडे ठेवणे व तपासणीसांना मागणी केल्यावर दाखविणे बंधनकारक आहे़
९. रा़ प बसमधून विना तिकीट प्रवास करणे हा मोटार वाहन कायदा १९८८ मधील कलम १७८(१)व कलम २००(१) अन्वये गुन्हा आहे़ या नुसार प्रवाशांस रु़ १००/- किवा चुकविलेल्या प्रवास भाडे रक्कमेच्या दुप्पट यापैकी जी जास्त असले ती रक्कम दंडापोटी वसुल करण्यात येईल़ या खेरीज चुकविलेले प्रवास भाडे सुध्दा वसुल करण्यात येईल़
१०. चालत्या बसमध्ये चढ - उतार करु नये़
११. बेवारस वस्तु आढळल्यास त्वरीत वाहक / स्थानक प्रमुख यांचे निर्दशनास आणावी़ अशा वस्तुस स्पर्श करू नये