(१) प्रवाशास प्रवासादरम्यान सामान वाहतूक करावयाची झाल्यास इंडियन कॅरियर अॅक्ट १९६५ मधील तरतुदींचे पालन करणे आवयक आहे़ प्रचलित कायदयान्वये प्रतिबंधित केलेल्या सामानाची वाहतूक करता येणार नाही़ नगरपालिकांचे स्थानिक कर/जकात प्रवाशांना अदा करावी लागते़
(२) प्रवाशास हमालीचा स्वतंत्र आकार अदा करणे आवयक आहे़
(३) नैसर्गिक आपत्तीमुळे सामान हरवल्यास महामंडळ जबाबदार राहणार नाही़ महामंडळाच्य कर्मचा-याच्या दोषामुळे सामानाची नासधूस झाल्यास होणा-या नुकसानीस महामंडळ जबाबदार राहील
(४) सामानाची बांधणी सुरक्षित नसल्यामुळे त्याची नासधूस झाल्यास महामंडळ जबाबदार राहणार नाही़
(५) सामानाचा आकार वसूल केल्यानंतरसुध्दा सामानाचे पुनःवजन करण्याचे अधिकार महामंडळास राहतील व पुनःवजनात सामानाचे वजन जास्त भरल्यास जादा वजनाप्रमाणे आकार प्रवाशास दयावा लागेल़
(६) प्रवासी सामान डाग ४० कि़ ग्रॅ व आकारमान ०. ७५ x ०. ५ x ०. ५ (मिटर) पेक्षा अधिक नसावे़ प्रवासी सामान स्वीकारण्याचे हक्क महामंडळाकडे आहेत
(७) प्रवासी सामानापोटी उचित सामान वाहतूक आकार वाहकास देऊन त्याची स्वतंत्र तिकिटे प्रवाशांकडून संबंधित प्रवाशाने घेणे आवयक आहे़