प्रवासी वाहतूकीसारख्या सार्वजनिक उपक्रमामध्ये जनसंपर्काला अनन्य साधारण महत्त्व आहे़.जनसंपर्क हे महामंडळ आणि प्रवासी यांच्यामधला महत्त्वाचा दुवा आहे़. जनमानसात महामंडळाची प्रतिमा उंचावण्याची महत्त्वाची भूमिका जनसंपर्क शाखा पार पाडते.
महामंडळाच्या स्थापनेनंतर सन १९४९ मध्ये महामंडळात जनसंपर्क शाखा सुरु करण्यात आली. प्रवासी वाहतूकीच्या राष्ट्रीयकरणासाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे तसेच खाजगी वाहतूकीच्या विरोधात जनमानसात राष्ट्रीयकृत प्रवासी वाहतूकीचे महत्त्व बिंबवणे हे जनसंपर्क शाखेचे महत्वाचे कार्य होते. कालांतराने जनसंपर्काच्या भूमिकेत परिस्थितीनुरुप बदल होत गेला व प्रसंगानुरुप जनसंपर्काच्या काम केले गेले. परंतु, महामंडळ आणि प्रवासी यांच्यात सलोख्याचे संबंध प्रस्थापित करण्याची जबाबदारी नेहमीच जनसंपर्क शाखा पार पाडते.
संपूर्ण महामंडळाची जनसंपर्काची बहुतांश कामे मध्यवर्ती कार्यालयातील जनसंपर्क शाखेमार्फत हाताळण्यात येत असून सध्या येथे १ सहा.जनसंपर्क अधिकारी आणि ३ कनिष्ठ कारकून कार्यरत आहेत. जनसंपर्क शाखा मा. उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांचे थेट अधिपत्याखाली कार्यरत असून विभागीय स्तरावर विभाग नियंत्राकामार्फत स्थानिक जनसंपर्काचे काम पाहिले जाते.
प्रवाशांना पुरेशी, कार्यक्षम, किफायतशीर, सुरक्षित व दर्जेदार सेवा देण्याचे महामंडळाचे धोरण राबवितांना सलोख्याचे व सौहार्दाचे संबंध प्रस्थापित करुन महामंडळाची जनमानसातील प्रतिमा उंचावणे.
जनसंपर्क शाखेच्या कामाचे स्वरुप खालीलप्रमाणे आहे :
प्रसार माध्यमांशी चांगले संबंध प्रस्थापित करणे, जनमानसातील प्रतिमा उंचावण्यासाठी तसेच जनतेशी चांगले संबंध निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रसिध्दी माध्यमांचा उपयोग केला जातो. महामंडळाद्वारे राबविल्या जाणा-या उपक्रमांची माहिती जनतेला व्हावी या दृष्टीने प्रसिध्दी पत्रके प्रसारीत केली जातात तसेच पत्रकार परिषदा व पत्रकार दौरे आयोजित केले जातात. वरिष्ठ अधिका-यांच्या मुलाखतीही वृत्तवाहिन्यांवर आयोजित केल्या जातात.
एस टी़ महामंडळाशी संबंधित वृत्तपत्रातून येणा-या बातम्या, सूचना / तक्रारी, लेख प्रवाशांच्या इत्यादींची योग्य दखल घेणे तसेच टीकात्मक वृत्तांची योग्य ती चौकशी करुन वस्तुस्थिती दर्शक समर्पक खुलासा करणे.
प्रवासी तक्रारींची त्वरीत दखल घेऊन त्यांचे निराकरण करणे़.
महामंडळाच्या नूतन वास्तूंचे उद्घाटन, भूमिपूजन समारंभ आयोजित करणे व त्या अनुषंगाने होणा-या खर्चावर नियंत्रण ठेवणे़
भिंतीपत्रके, स्टिकर्स, आवाहन पत्रके या प्रचार साहित्यांची तसेच दूरध्वनी निर्देशिका, नागरिक सनद इत्यादींची छपाई व वितरण करणे़.
राज्यातील वृत्तपत्रांची यादी तयार करुन त्यात निविदा, नोकरभरती, सूचना इत्यादी वेळोवेळी प्रसिध्द करणे.
राजशिष्टाचाराशी निगडीत कामे व अतिमहत्त्वाच्या मान्यवरांच्या भेटीसंबंधीची व्यवस्था़
महामंडळाच्या संकेतस्थळावर (www.msrtc.maharashtra.gov.in) येणारे इ-मेल संबंधित खाते/शाखांना पाठविणे अथवा त्यांना उत्तर देणे़
महामंडळाच्या फेसबुक पृष्ठावरील (www.facebook.com/msrtc.in) प्रतिक्रिया तपासणे
एस टी़ महामंडळ राज्याच्या, शहरी व ग्रामीण भागात "रस्ता तेथे एस टी़ '' या तत्त्वावर किंबहुना दुर्गम आदिवासी भागात तोटा सहन करुन दर्जेदार, नियमित, किफायतशीर, वक्तशीर, आरामदायी व सुरक्षित प्रवासाची हमी देऊन सेवा देते़. आजच्या स्पर्धात्मक युगात एसटीसेवा अधिकाधिकधिक लोकाभिमुख होण्यासाठी आखलेल्या योजना तमाम जनतेपर्यंत पोहोचवून त्यांचा सहभाग मिळवावयाचा असतो़ हे साध्य करण्यासाठी जनसंपर्क शाखेची उदिद्ष्टे खालीलप्रमाणे आहेत़ :-
महामंडळाची प्रतिमा उचावणे़
महामंडळाला सदिच्छा मिळवून देणे़
महामंडळाचे व्यावसायिक व धंदेवाईक उद्दीष्ट साध्य करणे़
महामंडळाची ध्येय - धोरणे जनतेपर्यंत पोहोचविणे
महामंडळाशी संबंधित सर्व प्रकारच्या लोकसमूहांसोबत सलोख्याचे व सौहार्दाचे संबंध निर्माण करणे़
एस़ टी़ सेवेबाबत जनजागृती करणे़
महामंडळाविषयी प्रवाशांमध्ये काही गैरसमज असल्यास त्याचे निराकरण करणे़
दूरध्वनी - ०२२-२३०२३९००
०२२-२३०७५५३९