Toll Free - Helpline No.: 1800 22 1250

OUR MOTTO : "Safe & Accident Free Bus Service"

Highlight:
 • Goods Transport Services of MSRTC" For more information pl. contact :- 022-23024068
 • For Technical Assistance ,Please Call 022-23053992
 • For any assistance/queries in respect of online reservation system contact our Call-Centre No. 1800221250

Security & Vigilance Department


SECURITY & VIGILANCE DEPARTMENT


१) इतिहास (History):-

रस्ते वाहतूक कायदा व त्याखाली केलेल्या अधिनियमानुसार दिनांक १४ एप्रिल, १९५२ रोजी मुंबई राज्य वाहतूक महामंडळ अस्तित्वांत आले. १९५६ मध्ये राज्याच्या संरचनेनुसार भा्षानिहाय गुजरात व महाराष्ट्र अशा दोन राज्यांत विभाजन होवून १ मे, १९६० मध्ये राज्यनिहाय वाहतूक चलन क्षेत्राप्रमाणे दोन उदयास आलेल्या राज्यांत वर्ग करण्यांत आले. त्याचप्रमाणे विदर्भ आणि मराठवाडा येथील वाहतूक चलन जे प्रांतीय वाहतूक सेवा मध्यप्रदेश आणि रस्ते वाहतूक खाते हैद्राबाद यांच्या अधिपत्याखाली होते. त्यांचे बॉम्बे राज्य रस्ते वाहतूक महामंडळामध्ये विलीनीकरण करुन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ हे उदयास आले. सदरचे महामंडळ महाराष्ट्र राज्यभर व राज्याच्या बाहेरही प्रवासी वाहतूक सेवा करीत आहे. रा.प. महामंडळाच्या संरचनेनुसार सुरक्षा व दक्षता खाते हे एक प्रमुख व महत्वाचे खाते आहे. या खात्याच्या प्रमुख पदी भारतीय पोलिस सेवेतील वरिष्ठ अधिका-यांची प्रतिनियुक्ती शासनातर्फ़े करण्यांत येते. सुरक्षा कामाचे बाबत हे खाते प्रामुख्याने महामंडळाचे "डोळॆ व कान" असे संबोधले जाते. या खात्याचे महत्व जाणुनबुजून महामंडळाने १९८२ पासून "सुरक्षा व दक्षता खाते" म्हणून संबोधले आहे.या खात्याची कामे गोपनीयरित्या करण्यांत येतात.

२) सुरक्षा व दक्षता खात्याची संरचना (Structure Of S & V Dept):- सोबत जोडले आहे.


3) सुरक्षा व दक्षता खात्याचे धोरण (Policy):-


महाराष्ट्र शासनाने रा.प. महामंडळाने वेळावेळी निश्चित केलेली धोरणे व त्यातील सुरक्षा व दक्षता खात्याशी संबंधित असणा-या बाबी व त्यास अभिप्रेत असलेली फ़लश्रुती सुरक्षा व दक्षता खात्याकडून राबविली जातात..

४) सुरक्षा व दक्षता खात्याची कार्ये व कर्तव्ये (Working / Function):-

 1. रा.प. महामंडळाच्या मालमत्तेचे व सामुग्रीचे रक्षण करणे.
 2. अवैध प्रवासी वाहतूक तपासणी करण्यामध्ये वाहतूक विभागाला मदत करणे.
 3. दक्षता : अफ़रातफ़र, आर्थिक गैरप्रकार व महामंडळाचे आर्थिक नुकसान करणारी प्रकरणे उघडकीस आणणे.
 4. चौकशी : मा.मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय व इतरांकडून प्राप्त झालेल्या तक्रारीची चौकशी करणे.
 5. बस तपासणी : महामार्ग व निर्गम परिसरातील मार्गावर धावणा-या रा.प.बसेसची वेळावेळी तपासणी करणे.
 6. प्रवाशांची सुरक्षितता : प्रवाशांची सुरक्षितता अबाधित रहावी म्हणून रा.प. महामंडळाच्या बसेसवर काम करणारे चालक मद्यपान करुन अति वेगाने व निष्काळजीपणाने बस चालवितात किंवा कसे ? याची अधूनमधून शहानिशा करणे.
 7. कोट्यावधी रुपयांचे इंधन, वंगण, भांडार सामानाची खरेदी केल्यावर त्याची आवक / जावक व्यवस्थित होते किंवा नाही त्याबद्दलची तपासणी करणे.
 8. रा.प.चे कोट्यावधी किंमतीचे भंगार माल विकल्यावर त्याचे वितरण करतांना गैरप्रकार होवू नये म्हणून त्यावर देखरेख ठेवणे.

सुरक्षा व दक्षता खात्याने एप्रिल २०१४ ते मार्च २०१५ तसेच एप्रिल २०१५ ते जून २०१५ या कालावधीत केलेल्या कामगिरीचा तपशील खालीलप्रमाणे :-


सुरक्षा व दक्षता खात्याने एप्रिल २०१४ ते मार्च २०१५ या कालावधीत एकूण १,६२,७३८ बसेस तपासल्या असून, वाहकाची ३६२३ अपहार प्रकरणे उघडकीस आणली आहेत. त्याची अंतर्भूत रक्कम रु. ४,४२,७५५/- इतकी आहे. तसेच, चोरटी प्रवासी वाहतूक करणारी एकूण ८,२८३ वाहने पोलिस व आर.टी.ओ. च्या मदतीने पकडली आहे. सुरक्षा व दक्षता खात्याने एकूण २३५ दक्षता प्रकरणे उघडकीस आणली असून, ७०४ चौकशी प्रकरणे हाताळली आहेत. रा.प. मालमत्तेची चोरी होवू नये म्हणून सुरक्षा व दक्षता कर्मचारी हे रात्रफ़ेरी व रात्रवस्ती करीत असतात. त्यांनी एकूण १०,५६९ रात्रफ़े-या केल्या असून, ६,१४४ रात्रवस्त्या केल्या आहेत.
तसेच सुरक्षा व दक्षता खात्याने  एप्रिल २०१५ ते जून २०१५ या कालावधीत एकूण २३९५६ बसेस तपासल्या असून, वाहकाची ३३७ अपहार प्रकरणे उघडकीस आणली आहेत. त्याची अंतर्भूत रक्कम रु. २८१८८/- इतकी आहे. तसेच, चोरटी प्रवासी वाहतूक करणारी एकूण १४६६ वाहने पोलिस व आर.टी.ओ. च्या मदतीने पकडली असून, त्यांची एकूण अंतर्भूत रक्कम रु. १२०२३८४/- इतकी आहे. सुरक्षा व दक्षता खात्याने एकूण २३ दक्षता प्रकरणे उघडकीस आणली असून,१७२चौकशी प्रकरणे हाताळली आहेत. रा.प. मालमत्तेची चोरी होवू नये म्हणून सुरक्षा व दक्षता कर्मचारी हे रात्रफ़ेरी व रात्रवस्ती करीत असतात. त्यांनी एकूण २२५५ रात्रफ़े-या केल्या असून, १२९९ रात्रवस्त्या केल्या आहेत.

५) उद्देश (Objectives):-


रा.प. महामंडळातील सुरक्षा व दक्षता खात्यास व्यवस्थापनाचे "डोळॆ व कान" म्हणून संबोधिले आहे. सुरक्षा व दक्षता खात्याचा प्रमुख उद्देश महामंडळात होणा-या अफ़रातफ़र, आर्थिक गैरव्यवहार व महामंडळास आर्थिक हानी पोहोचविणारी प्रकरणे वेळीच उघडकीस आणून त्यास प्रतिबंध करणे, त्याप्रमाणे प्रवाशी जनतेला कायदा व सुव्यवस्था पुरविण्याच्या दॄष्टीने कायदा व सुव्यवस्थेकडे बारकाईने लक्ष देणे व महामंडळास वेळावेळी या बाबी अवगत करणे इ. कामे करावी लागतात.

६) कार्यक्षेत्र (Area of Service):-


सुरक्षा व दक्षता खात्याच्या संरचनेत दर्शविल्याप्रमाणे विभाग व जिल्हानिहाय वरिष्ठ सुरक्षा व दक्षता अधिकारी / सुरक्षा व दक्षता अधिकारी व त्यांचे हाताखालील पर्यवेक्षकीय कर्मचा-यांची मंजूरी दिलेली आहे. हे अधिकारी व कर्मचारी त्यांच्या क्षेत्रात खात्याची उद्दिष्टे व कर्तव्य जबाबदारीने पार पाडीत असतात. कायदा व सुव्यवस्था भंग होणा-या घटना व महामंडळास हानी पोहोचविणारे प्रसंग हे तात्काळ मध्यवर्ती कार्यालयास कळवित असतात व महामंडळाच्या पातळीवर संबंधित जिल्ह्याच्या पोलिस यंत्रणेशी संपर्क साधून अशा घटना/प्रसंगावर वेळीच प्रतिबंधात्मक कारवाई करणे किंवा महामंडळास व प्रवासी जनतेस हानी पोहोचू नये म्हणून योग्य ती पावले उचलणे , प्रवास सुरक्षित होण्याकरिता प्रभावीपणे कार्य करणे ही सर्व महत्वाची कर्तव्ये सुरक्षा व दक्षता खात्याच्या संबंधित क्षेत्रातील अधिकारी/कर्मचारी दक्षतेने पार पाडीत असतात.

७) रा.प. महामंडळातील सुरक्षा व दक्षता खात्याची कार्यालयाची यादी व सुरक्षा व दक्षता अधिका-यांचे दूरध्वनी क्रमांक सोबत परिशिष्ट "ब" मध्ये आहेत.


 

 

Sr. No.

 

Name of the Division Designation Office Phone No.
1. Central Office, Mumbai Chief Security & Vigilance Officer 022-23023922 
2. Central Office, Mumbai Dy. Chief Security & Vigilance Officer (West) 022-23023923
3. Central Office, Mumbai Dy. Chief Security & Vigilance Officer (East) 022-23023924
4. Central Office, Mumbai Security & Vigilance Officer-I 022-23023925
5. Central Office, Mumbai Security & Vigilance Officer-II 022-23023926
6. Central Office, Mumbai P.A. to C.S. & V.O. 022-23023910
7. Mumbai Division Sr. Security & Vigilance Officer 022-25139217
8. Thane Division Security & Vigilance Officer 022-25427081
9. Palghar Division Security & Vigilance Officer 02525-255236
10. Ratnagiri Division Security & Vigilance Officer 02352-223530
11. Raigad Division Security & Vigilance Officer 02143-254919
12. Sindhudurg Division Security & Vigilance Officer 02367-233553
13. Nashik Division Sr. Security & Vigilance Officer 0253-2309311
14. Dhule Division Security & Vigilance Officer 02562-238362
15. Jalgaon Division Security & Vigilance Officer 0257-2229432
16. Ahmednagar Division Security & Vigilance Officer 0241-2416608
17. Pune Division Sr. Security & Vigilance Officer 020-24442622
18. Central Workshop, Daodi, Pune. Security & Vigilance Officer 020-27143650
19. Satara Division Security & Vigilance Officer 02162-238167
20. Solapur Division Security & Vigilance Officer 0217-2733337
21. Kolhapur Division Security & Vigilance Officer 0231-2650973
22. Sangli Division Security & Vigilance Officer 0233- 23331247
23. Aurangabad Division Sr. Security & Vigilance Officer 0240-2242159
24. Central Workshop, Aurangabad Security & Vigilance Officer 0240-2240146
25. Beed Division Security & Vigilance Officer 02442-222685
26. Parbhani Division Security & Vigilance Officer 02452-220938
27. Jalna Division Security & Vigilance Officer 02482--220209
28. Nanded Division Security & Vigilance Officer 02462-260884
29. Osmanabad Division Security & Vigilance Officer 02472-223352
30. Latur Division Security & Vigilance Officer 02382-228378
31. Nagpur Division Sr. Security & Vigilance Officer 0712-2541462
32. C.W. Nagpur Security & Vigilance Officer 07104-237226
33. Bhandara Division Security & Vigilance Officer 07184-252501
34. Chandrapur Division Security & Vigilance Officer 07172-252028
35. Wardha Division Security & Vigilance Officer 07152-243579
36. Gadchiroli Division Security & Vigilance Officer  
37. Amravati Division Sr. Security & Vigilance Officer 0721-2662271
38. Akola Division Security & Vigilance Officer 0724-2489552
39. Buldhana Division Security & Vigilance Officer 07262-2244814
40. Yavatmal Division Security & Vigilance Officer 07232-245138


SECURITY & VIGILANCE DEPARTMENT CIRCULARS :-

SECURITY & VIGILANCE DEPARTMENT CIRCULARS
Circulars 2021 Circulars 2020 Circulars 2019
Circulars 2018 Circulars 2017 Circulars 2016
Circulars 2015 GSO Duties and Function of S&Vo department
Transfer policy S.G Extra
Transfer policy of unit cader For leave General
Avedhya pravasi vahtuk Diesel