.jpg)
 |
दादर-पुणे-दादर मार्गावर महामंडळांची वाहतूक सेवा सन 1981 पासून चालू आहे. जसजशी ही वाहतूक लोकप्रिय होत गेली तसतसे या मार्गावर फे-या वाढविण्यात आल्या.
दिनांक 28.12.2002 पासून दादर - पुणे रेल्वे स्टेशन या मार्गावर 5 वातानूकूलित अश्वमेध बसेसची वाहतूक चालू करण्यात आलेली असून प्रत्येक बसच्या प्रत्येकी दोन परतीच्या फेर्या चालू करण्यात आल्या. या व्होल्वो बस वाहतूकीस प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने सदर मार्गावर आणखी नवीन वातानूकुलीत बसेस चालनात आणण्यात आल्या आहेत, तसेच दादर - स्वारगेट, ठाणे - स्वारगेट, बोरीवली-सायन-स्वारगेट, नाशिक-पुणे, औरंगाबाद-पुणे, सांगली-पुणे रेल्वे स्टेशन, कोल्हापूर-पुणे रेल्वे स्टेशन व इ. मार्गावर वातानुकूलीत बसेस प्रवाश्यांची निकड पाहून चालनात आणण्यात आल्या आहेत. याशिवाय दादर - पुणे मार्गावर रा.प. महामंडळांकडून मल्टी अॅक्सेल व्होल्वो 2 बसेस चालू केल्या आहेत. दादर-पुणे रेल्वे स्टेशन व नाशिक पुणे मार्गावर निम आराम, वातानुकूलित (शितल) बस चालू आहेत व्होल्वो बसेसना ''शिवनेरी'' व मल्टी अॅक्सेल व्होल्वो बसेसना ''अश्वमेध''व निमआराम वातानुकूलित बसेसना ''शितल'' असे नाव देण्यात आले आहे. सध्या चालविण्यात येणार्या सदर वाहतूकीचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
विभाग |
मार्ग |
दैनंदिन फेऱ्यांची संख्या |
|
शिवनेरी |
|
मुंबई |
दादर (मुंबई)-पुणे रेल्वे स्टेशन |
50 |
दादर (मुंबई)-पुणे (स्वारगेट) |
8 |
ठाणे |
ठाणे-पुणे (स्वारगेट) |
20 |
नाशिक |
नाशिक-पुणे (शिवाजीनगर ) |
5 |
औरंगाबाद |
औरंगाबाद-पुणे (शिवाजीनगर) |
6 |
पुणे |
पुणे रेल्वे स्टेशन - दादर(मुंबई) |
54 |
पुणे (शिवाजीनगर)-नाशिक |
3 |
पुणे स्वारगेट-ठाणे |
16 |
पुणे स्वारगेट-बोरीवली |
20 |
पुणे (शिवाजीनगर)-औरंगाबाद |
9 |
स्वारगेट – दादर (मुंबई) |
8 |
सांगली |
सांगली-पुणे रेल्वे स्टेशन |
3 |
कोल्हापूर |
कोल्हापूर-पुणे रेल्वे स्टेशन |
6 |
निमआराम वातानुकूलीत (शितल) |
विभाग |
मार्ग |
दैनंदिन फेर्यांची संख्या |
नाशिक |
नाशिक – पुणे |
6 |
पुणे |
पुणे – नाशिक |
3 |
|