Toll Free - Helpline No.: 1800 22 1250

OUR MOTTO : "Safe & Accident Free Bus Service"

Highlight:
  • जाहिरात क्र.०२ नुसार म.रा.मा.प महामंडळातील ०९ विभागांकरीता चालक तथा वाहक पदासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्याची प्रक्रिया दि.०८/०२/२०१९ पासून msrtcexam.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे.
  • जाहिरात क्र.०१ नुसार दुष्काळग्र्स्त जिल्ह्यातील १२ विभागाकरिता चालक तथा वाहक पदाची सरळसेवा भरती सन २०१९ करीता जाहिरात व अर्ज करण्यासाठी www.msrtcexam.in या संकेतस्थळावर भेट द्यावी.
  • एसटी’ची आता मालवाहतूक आणि गोदामेही
  • For any assistance/queries in respect of online reservation system contact our Helpdesk No. 022-23053992.

Concessions

सवलती

दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सवलतीचे पास -

अ) दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मासिक सवलतीचे पास :

पूर्वी दररोज प्रवास करणार्या प्रवाशांमध्ये नोकरदार वर्ग व व्यापारी वर्ग असे वर्गीकरण करुन त्यांना सुटटीचे दिवस वगळून प्रवास करण्यासाठी सवलतीचा पास देण्यात येत असे. तथापि महामंडळांने ठराव क्र. ९८.०५.२१, दिनांक २१.०५.१९९८ नुसार सदर योजनेमध्ये सुधारणा केली असून २० दिवसाच्या दुहेरी प्रवासाचे भाडे आकारुन मासिक पास देण्यात येतो.

ब) दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्रैमासिक सवलतीचे पास :

पत्र क्र.राप/ वाह/ चालन/ सवलत/ त्रैमासिक पास/ २४५९ दिनांक २३ एप्रिल, २०१० नुसार दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ५० दिवसांचे दुहेरी प्रवास भाडे भरुन तीने महिने प्रवास करण्याची सवलत दिनांक २ मे २०१० पासून देण्यात आली आहे. रातराणी सेवा जादा बसेस - प्रवाशांचा रात्रीच्या बसमधून प्रवास करण्याचा वाढलेला कल विचारात घेऊन रात्रीच्या जादा बसेस सोडण्यात येतात. यापूर्वी रात्रीच्या जादा बसेस सोडण्यात येत नसत. प्रासंगिक करारावर सुध्दा रात्रीच्या जादा बसेस देण्यात येतात.

विविध सवलती -

रा.प.महामंडळांकडून २४ विविध सामाजिक घटकांना प्रवासी भाडयात सवलती देण्यात येत आहेत. सदर सवलतींपोटी सन २०१२-२०१३ या वित्तिय वर्षात शासनाकडून येणे असलेल्या १०५६.७० कोटी इतक्या मुल्यांची सवलत देण्यात आलेली असून एकूण असमायोजित सवलत मूल्य १५२५.७० कोटी रक्कम रा.प.महामंडळांकडून शासनाला देय होणाऱ्या प्रवासी करातून समायोजित करण्यासाठी शासनास सादर करण्यात आले आहे. रा.प. बसेसमधून विविध सामाजिक घटकांना देण्यात येत असलेल्या प्रवास भाडे सवलत योजना -

अ. क्र. सवलतींचा तपशील सवलत अनुज्ञेय बससेवा प्रकार प्रवासभाडयातील सवलत टक्केवारी
स्वातंत्र सैनिक व त्याचे एक साथीदार यांना वर्षभर मोफत प्रवास सवलत साधी, निमआराम, आराम १००
डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्ती व एक साथीदार यांना वर्षभर मोफत प्रवास सवलत साधी, निमआराम, आराम १००
अहिल्याबाई होळकर योजनेप्रमाणे इ. ५वी ते १०वी पर्यंत शिक्षण घेणार्या ग्रामीण भागातील विद्दयार्थीनीसाठी साधी १००
शासन अधिस्वीकृतीधारक पत्रकार-साधी बस ८००० कि.मी. प्रवासभाडे मूल्य आकारुन अमर्याद प्रवास सवलत साधी, निमआराम १००
राज्यातील ६५ वर्षावरील जेष्ठ नागरिक साधी, निमआराम ५०
विद्यार्थी मासिक पास सवलत साधी ६६.६७
विद्यार्थ्यांना नैमित्तिक करारावर देण्यात येणारी सवलत साधी ५०
विद्यार्थ्यांना मोठया सुटृीत मुळ गावी येणे जाणे, परिक्षेला जाणे, शैक्षणिक कॅम्पला जाणे, आजारी आई वडिलांना भेटण्यास जाण्या/येण्या साठीची सवलत साधी ५०
अंध व अंपग व्यक्ती साधी, निमआराम ७५
१० अंध व अंपग व्यक्ती तसेच त्यांचे मदतनीस साधी, निमआराम ५०
११ क्षय रोगी वैदयकीय उपचारासाठी साधी ५०
१२ कर्क रोगी वैदयकीय उपचारासाठी साधी ५०
१३ कृष्ठ रोगी वैदयकीय उपचारासाठी साधी ७५
१४ राज्य शासनाने पुरस्कृत केलेल्या खेळांमध्ये भाग घेतलेल्या विजेत्या स्पर्धकांसाठी साधी ३३.३३
१५ विद्यार्थी जेवणाचे डबे साधी १००
१६ अर्जुन, द्रोणाचार्य, दादोजी कोंडदेव व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू यांना वार्षिक ५०० मुल्यापर्यंत साधी, निमआराम, आराम १००
१७ आदिवासी पुरस्कार प्राप्त व्यक्ती व त्यांचे एक साथीदार यांना वर्षभर मोफत प्रवास सवलत साधी, निमआराम, आराम १००
१८ लोकशाहीर आण्णाभाऊ साठे पुरस्कार्थी व त्यांचे साथीदार यांना वर्षभर मोफत प्रवास सवलत साधी, निमआराम, आराम १००
१९ पंढरपूर आषाढी/कार्तिकी एकादशीला शासकीय पुजेचे मान मिळांलेल्या एका वारकरी दाम्पत्यास फक्त एका वर्षासाठी ९००० पर्यंत मुल्या इतकी मोफत प्रवास सवलत साधी, निमआराम १००
२० विधानमंडळ सदस्य व त्यांचे एक साथीदार यांना वर्षभर मोफत सवलत साधी, निमआराम, आराम १००
२१ माजी विधान मंडळ सदस्य व त्यांचे एक साथीदार यांना वर्षभर मोफत सवलत साधी, निमआराम, आराम १००
२२ रेसक्यू होममधील मुलांना वर्षातून एकदा सहलीकरिता साधी ६६.६७
२३ मुंबई पुनर्वसन केंद्रातील मानसिक दृष्टया अपंग विद्दयार्थ्यांच्या सहलीसाठी साधी ६६.६७
२४ अपंग गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त व्यक्ति व त्यांचे साथीदार साधी, निमआराम १००

विविध सामाजिक घटकांना अनुज्ञेय असणाऱ्या सवलतधारक लाभार्थीची संख्या व वर्षनिहाय एकूण सवलत मुल्य -

क्र. वर्ष लाभार्थींची संख्या (कोटी) सवलतीची एकूण रक्कम ( कोटी)    
२००७-२००८ १८.९३ ४९९.७९    
२००८-२००९ २०.७० ५९१.९१    
२००९-२०१० २५.७६ ६७३.४४    
२०१०-२०११ २७.६९ ७६५.७६    
२०११-२०१२ ३५.०६ ९०८.११    
२०१२-२०१३ ३८.२७ १०४८.७६    
२०१३-१४ ३९.२० १२३३.०४