Toll Free - Helpline No.: 1800 22 1250

OUR MOTTO : "Safe & Accident Free Bus Service"

Highlight:
  • जाहिरात क्र.०२ नुसार म.रा.मा.प महामंडळातील ०९ विभागांकरीता चालक तथा वाहक पदासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्याची प्रक्रिया दि.०८/०२/२०१९ पासून msrtcexam.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे.
  • जाहिरात क्र.०१ नुसार दुष्काळग्र्स्त जिल्ह्यातील १२ विभागाकरिता चालक तथा वाहक पदाची सरळसेवा भरती सन २०१९ करीता जाहिरात व अर्ज करण्यासाठी www.msrtcexam.in या संकेतस्थळावर भेट द्यावी.
  • एसटी’ची आता मालवाहतूक आणि गोदामेही
  • For any assistance/queries in respect of online reservation system contact our Helpdesk No. 022-23053992.

Yearly Concession Card Scheme

वार्षिक सवलत कार्ड योजना

रा. प. प्रवासी सेवेकडे अधिक प्रवासी आकृष्ठ व्हावेत म्हणून वार्षिक सवलत कार्ड योजना (Annual Concession Card) दिनांक 6 सप्टेंबर, 2003 पासून चालू करण्यात आलेली आहे. या योजनेची ठळक वैशिष्ठे खालीलप्रमाणे आहेत.

वार्षिक सवलत कार्डाची किंमत ₹ २००/- कोणत्याही आगारात जमा करुन प्रवाशास ते घेता येते़ त्यावर प्रवाशाचा फोटो व इतर तपशिल दर्शविण्यात येईल.

प्रवासात वाहकाला वार्षिक सवलत कार्ड दाखविल्यावर साध्या व निमआराम ( शहरी सेवा वगळून ) प्रवास भाडयात प्रवाशाला 10 % सूट देण्यात येईल मात्र 18 कि़ मी़ पेक्षा अंतर कमी असू नये.

वार्षिक सवलत कार्ड घेतल्यापासून एक वर्ष वैध राहील.

कार्डधारक प्रवाशाचा रा. प. प्रवासात दुर्दैवाने अपघात प्रकरणात देत असलेल्या नियमित नुकसान भरपाई व्यतिरिक्त नुकसान भरपाई ₹ १,५०,०००/- मृत प्रवाशाच्या वारसास व नामनिर्देशित केलेल्या व्यक्तीस अदा करण्यात येईल.