रा. प. महामंडळ प्रवासी वाढवा अभियान सर्व आगार व विभाग पातळीवर राबविते. प्रवासी वाढवा अभियान राबविण्याचा मुख्य उददेश हा महामंडळांपासून दूर गेलेला प्रवासी परत आकृष्ट करणे हा आहे. या अभियानात प्रामुख्याने गाडयांची स्वच्छता, नियमीतता ठेवणे, गाडयांच्या रंगसंगती व रचनेत बदल करणे त्याचप्रमाणे प्रवासी हा केंद्रबिंदू मानून त्यांना सौजन्यपूर्वक वागणूक देणे इत्यादि उपाय योजना करणे या बाबी सर्व स्तरांवर सातत्याने अंमलात आणल्या जातात. तसेच प्रामुख्याने वाहक, चालक, यांत्रिक व इतर कर्मचारी यांचे संबोधन केले जाते