Toll Free - Helpline No.: 1800 22 1250

OUR MOTTO : "Safe & Accident Free Bus Service"

Highlight:

Human Development Scheme

मानव विकास योजना

शासन निर्देश क्र. माविनि/2010/प्र.क्र.81/का-1418, दिनांक 14.07.2011 अन्वये मानव विकास निर्देशांक उंचावण्याकरीता मानव विकास ही संकल्पना मागासलेल्या तालुक्यांतर्गत स्त्री साक्षरतेचे प्रमाण व दारिद्रय रेषेखालील कुटुंबाचे प्रमाण हे निकष विचारात घेऊन मागास जिल्हयांतर्गत येणार्‍या तालुक्यांमध्ये राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या अंतर्गत ग्रामीण भागातील सर्व मुलींना 12 वी पर्यंत शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणुन गाव ते शाळा दरम्यान मोफत वाहतुकीची सुविधा उपलब्ध करुन देण्याकरिता रा.प. महामंडळांस वाहन खरेदीसाठी राज्य शासनाने निधी उपलब्ध करुन दिला. सदर योजने अंतर्गत प्रति तालुका 5 या प्रमाणे 125 तालुक्यांमध्ये 625 बसेस व्दारे जुन, 2012 पासुन योजना अंमलबजावणीस सुरुवात करण्यात आली आहे.