Toll Free - Helpline No.: 1800 22 1250

OUR MOTTO : "Safe & Accident Free Bus Service"

Highlight:

4 & 7 Days Passes

 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ "आवडेल तेथे  प्रवास" सन १९८८ पासून प्रवाशांसाठी राबवित आहे. या योजने अंतर्गत ७ दिवसाच्या पासाप्रमाणे ४ दिवसाचा पास दिला जातो़ प्रवाशांच्या गरजेप्रमाणे या योजनेत बदल करण्यात आलेले आहेत. पुर्वी एकाच प्रकारच्या सेवेच्या पासाचे मूल्य पुढील वाढ होई पर्यंत एकच ठेवण्यात येत असे परंतु दिनांक २२. ९. २००३ पासून पासाच्या मूल्यासाठी २ हंगाम ठेवण्यात आलेले आहेत.

१. गर्दीचा हंगाम        :- १५ ऑक्टोबर ते १४ जून .

२. कमी गर्दीचा हंगाम :- १५ जून ते १४ ऑक्टोबर

दिनांक २८ ऑगस्ट २०१४ पासून दर खालिलप्रमाणे 

वाहतूक सेवेचा प्रकार ७ दिवसाच्या पासाचे मुल्य ४ दिवसाच्या पासाचे मुल्य
गर्दीचा हंगाम कमी गर्दीचा हंगाम गर्दीचा हंगाम कमी गर्दीचा हंगाम
प्रौढ मुले प्रौढ मुले प्रौढ मुले प्रौढ मुले
साधी (साधी,जलद,रात्रसेवा,शहरी,
  व यशवंती (मिडी) बस)
१४१५ ७१० १३१० ६५५ ८१० ४०५ ७५० ३७५
हिरकणी (निमआराम) बस १६३५ ८२० १५१० ७५५ ९३५ ४७० ८६५ ४३५
आंतरराज्य (साधी, निमआराम) १७६० ८८० १६३५ ८२० १०१० ५०५ ९३५ ४७०

(वर दर्शविलेले मुलांच्या पासाचे दर ५ वर्षापेक्षा जास्त व १२ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी आहेत. )

 

या योजनेचे मुख्य नियम खालील प्रमाणेः

या योजने अंतर्गत ७ व ४ दिवसाचे पास दिले जातील. साध्या सेवा (साधी, जलद, रात्रसेवा, शहरी, यशवंती (मिडी), हिरकणी (निमआराम), व आंतरराज्य सेवेच्या (साध्या व निमआराम) बसेसना ही योजना लागू करण्यात आली आहे. आंतरराज्य वाहतूकीवरील बसेससाठी दिला जाणारा पास साधी सेवा व निमआराम सेवेच्या बसेसमध्ये महाराष्ट्र राज्यातसुध्दा वैध राहील. उच्च दर्जाच्या सेवेचा पास निम्न दर्जाच्या सेवेस वैध राहील. जसे, निमआराम बसचा पास साधी, जलद, रात्रसेवा, शहरी,  यशवंती (मिडी) बसला वैध राहील. या योजनेचे पास प्रवास सुरू होण्याच्या १० दिवस अगोदरपर्यंत देण्यात यावा़

या योजने अंतर्गत देण्यात आलेले पास नियमीत गाडीसोबतच कोणत्याही जादा बसमध्ये विंत्र्वा पंढरपूर / आळंदी, गौरी गणपती, होळी, इत्यादि प्रसंगी सोडण्यात येणा-या जादा बसमध्ये किंवा यात्रा बसमध्ये वैध राहतील.

गाडीतील आसनासाठी हमी देता येणार नाही़. परंतु या योजनेतील पास धारकाना आसन आरक्षित करावयाचे असल्यास तो आपल्या बसचे आरक्षण करू शकतो़. त्यासाठी त्यास आरक्षणाचा प्रचलित आकार देऊन आरक्षणाचे तिकीट घ्यावे लागेल. मात्र आरक्षण तिकीटावर पासाचा क्रमांक असणे आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत प्रौढ पासधारकास ३० किलो पर्यंत व मुलास १५ किलोपर्यंतचे सामान विनाआकार नेता येईल. प्रत्येक पासावर पासधारकाचा फोटो लावणे आवश्यक राहील.

राप/वाह/सामान्य-८८ / ८०७२ दिनांक ०२/११/१९९८  - वाहतूक खाते परिपत्रक क्र. ३०/१९९८ अन्वये दिलेल्या सुचनांनुसार घरातील नातलगाचा मुत्यू, भुकंप, आग लागणे, आतिवृष्टी, महापूर नैसर्गिक आपत्ती इत्यादी कारणांमुळे पासधारकास पास रद्द करावयाचा असल्यास व त्याने तसे प्रवासाच्या तारखेपुर्वी पुराव्यासह कळविले असल्यास प्रत्येक पासामागे रू़ १०/- सेवा शुल्क वसुल करून उर्वरीत रकमेचा त्यास परतावा देण्यात यावा़ परंतु अशा बाबतीत सदर पासावर पुढील तारखेस प्रवास करण्याची प्रवाशाची इच्छा असल्यास त्याचा जुना पास रद्द करून त्याला नवीन पास देण्यात यावा, अशा प्रकरणी सेवा शुल्क आकारू नये़ यासाठीचे अधिकार विभागीय वाहतूक अधिकारी / आगार व्यवस्थापक याना देण्यात आलेले आहेत. पास हरविल्यास त्याचे ऐवजी दुसरा पास देण्यात येणार नाही. त्यामुळे हरविलेल्या पासावर या योजनेखाली प्रवास करता येणार नाही, तसेंच डुप्लीवेत्र्ट पास मिळणार नाही़. सदर हरविलेल्या पासाचा कोणताही परतावा मिळणार नाही़.

सदरचा पास अहस्तांतरणीय राहील.

प्रवासात गाडी नादुरूस्त झाल्यास, वैयक्तीक वस्तु हरविल्यास अथवा कोणतेही नुकसान झाल्यास महामंडळ जबाबदारी स्विकारणार नाही़

आवडेल तेथे कोठेही प्रवासाच्या पासाच्या दिवसाची गणना ००. ०० ते २४. ०० अशी करण्यात येते़ प्रवासी ७ विंत्र्वा ४ दिवसाचा पास घेऊन ज्यावेळी प्रवास करीत असतो व त्या पासाच्या प्रवासाच्या शेवटच्या दिवाशी रात्री २४. ०० वा. पास संपल्याने वाहकाने सदरचा पास तपासणे आवयक आहे. पासाच्या मुदतीच्या शेवटच्या दिवाशी जर रात्री २४. ०० नंतर पास संपला असेल व प्रवासी प्रवास करीत असेल तर ज्या ठिकाणी पास संपला असेल तेथून पुढील प्रवासाठी त्याचेकडून पुढील प्रवासाचा आकार वसुल करणे आवयक आहे अन्यथा त्याच्या पासाची मुदत संपल्याने व पुढील प्रवासाचे तिकीट न घेतल्याने तो विनातिकीट प्रवास करीत असल्याचे सिध्द होईल, परंतु पास संपल्याने प्रवासाचे पुढील तिकीट घेणे ही प्रवाशाची जबाबदारी आहे त्याचप्रमाणे मार्गात पास तपासून पुढील प्रवासाचे तिकीट देणे ही वाहकाची जबाबदारी राहील.

काहीवेळा रा. प. बसेस उशिरा सुटल्यामुळे, वाटेत बिघाड झाल्यामुळे अगर वाटेतील अडथल्यामुळे शेवटच्या दिवशी म्हणजे पासाची मुदत संपल्याच्या दिवशी जी बस २४.०० वाजणेपुर्वी इच्छित स्थळी पोहोचणार होती ती ००.०० वाजले नंतर पोहोचते त्यामुळे पासाची मुदत संपली म्हणून पासधारकांकडून जादा भाडे वसुल वेत्र्ले जाते, तसा आकार वसुल करू नये़ परंतु सदरची बस ००. ०० पुर्वी सुटली असल्यासच व पासधारक प्रवाशाचा प्रवास खंडीत झाला नसल्यास ही सवलत देता येईल.